Skip to main content

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  


कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

 

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरित पाण्याबद्दल आकडेवारीसह विस्तृत माहिती दिली. तसेच हे पाणी धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांना लवकर मिळावे यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत याबाबतही सविस्तर मांडणी केली. पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात नुकतीच कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाबाबत नुकतीच बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली राज्याचे मुख्यमंत्री असताना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती दिली. केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या पर्यावरणाशी निगडित मान्यता मिळवून घेतल्या. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला. २०२२ साली मराठवाड्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या २३.६६ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला फडणवीस साहेबांमुळे ११,७२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यामुळेच ७ टीएमसी पाण्याची कामे सध्या पूर्णत्वाच्या टप्प्यात आली आहेत. मात्र उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यासाठीही मुख्यमंत्री सकारात्मक असून मित्रच्या माध्यमातून उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर सकारात्मक प्रयत्न करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कृष्णा पाणी तंटा लवाद एकच्या आकडेवारीनुसार कृष्णा खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या हक्काचे ५९९ टीएमसी पाणी आजघडीला उपलब्ध आहे. त्यापैकी चांगला पाऊसकाळ झाल्यानंतरही केवळ ५२० टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याकडून वापरात आणले जात आहे. ४० टीएमसी पाण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यामुळे शिल्लक राहिलेल्या ३९  टीएमसी पाण्यातून मराठवाड्याचा न्याय हक्क असलेले १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू  असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावत २००१ साली मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली होती.त्यात वाढ करून २००९ मध्ये २३.६६ टीएमसी पाण्याला मंजुरी दिली.त्यातील ७ टीएमसीचे पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मात्र मराठवाड्याच्या हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड हे दोन जिल्हे कृष्णा खोऱ्यात आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचा या पाण्यावर न्याय हक्क आहे. या २३.६६ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला महायुती सरकारने ११ हजार ७२६ कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे आता उर्वरीत पाण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

तांत्रिक व कायदेशीर बाबींच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांकडे उच्चस्तरीय बैठक

कृष्णा तंटा लवाद क्रमांक १ नुसार आंतरखोरे पाणी वाटपास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. त्यामुळे हा विषय जलद गतीने पूर्ण करण्यासाठी व तांत्रिक आणि कायदेशीर बाबीवर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.या विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या पुर्ततेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत अवगत करण्यात येणार आहे.देवेंद्रजीनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला,प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करून घेतला त्यामुळेच ७ टीएमसीचा विषय पूर्णत्वास जात आहे.याबाबत देखील त्यांचे सहकार्य आपल्याला मिळणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा विषय पुढे घेऊन जात असून याबाबत सर्वांनी सकारात्मक राहून याबाबत सहकार्य करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

 





Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...