Skip to main content

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !



महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले

धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या

     सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .

     त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही  वर्षी करण्यात आला .

     सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या  अत्यावश्यक असलेले योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगशिक्षिका सौ गिलबिले  , सुवर्णा माळी , निर्जला माळी , नलिनी मालखरे , श्रीकवर त्रिकोणे , सरोज  चव्हाण व महिला पत्रकार शीला उंबरे व संगीता काळे यांचा सत्कार करण्यात आला .

      यावेळी भागिरथी परिवाराची संस्थापक युवा उद्योजक अभिराम पाटील व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डी . फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य  गोरख देशमुख ,  प्लाईंग कीडस इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिवच्या शीतल  शिंदे , प्रज्ञा ठोकळ , आरती उकाडे ,पूजा हंगरगेकर व मनोज लोमटे आदी उपस्थित होते .

 

Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...