Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

प्रकाशकाची माहिती

 

मुख्यमंत्री तर मि एकटा रेल्वे अडवेन ...

प्रती मा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई दिनांक २ जुलै २०२४   विषय – सन २०१३ साली जे एन एन आर यु एम कडून अनुदानातून घेतलेल्या बसेस जनसेवेसाठी उपलब्ध करून देणे कामी आणि सदर बसेस उपलब्ध होत नसतील तर सांगली अहमदनगर पनवेल ठाणे बृहन्मुंबई च्या धर्तीवर सोलापूर शहर अंतर्गत प्रवासी वाहतूक एम एस आर टी सी च्या बसेस ने सुरु करणे कामी   विनंती अर्ज अन्यथा मि स्वतः माझी वर्तमान पत्रे साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप च्या वतीने एकटा भारतीय रेल्वे समोर हातात तिरंगा घेऊन उभा राहून रेल्वे रोको करण्याचा इशारा ....   अर्जदार -   अर्जदार -     श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी    राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र क्रमांक LQV 4770665     शिधापत्रिका मांक   SN 845382    वाहन चालक परवाना    MH 1320090004270 ,  आयकर खाते ओळखपत्र ...

फडणवीस आणि अजित पवार तसेच शिंदे सरकार सोलापूर साठी एमएसआरटीसी बसेस सुरु करा

  सन २०१३ पासून  कोटीच्या घरात  रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार  भारत सरकारने दिलेल्या  कोटीच्या  अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली १०  वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?  सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या  कोटीच्या  अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आमी महापौर ...

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान ! धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या       सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .       त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही   वर्षी करण्यात आला .       सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या   अत्यावश्यक असले...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पुणे , दि. 13 : सुमधूर सनईवादन , सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना , महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन , गुजराती लोकनृत्य डांग , डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य , राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य , द ग्लोरी ऑफ सरहद , आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा ‘ वसुधैव कुटुम्बकम् ’ नृत्याविष्कार , महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या ‘ ऱ्हिदम ऑफ लावणी ’ श्री गणेश आरती …. अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे , फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे , याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केले. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भारत सरकारचा पर्...

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दिलासा

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार पाटील यांचा दिलासा जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना दिलासा  दिला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नव्याने होत असलेल्या रेल्वेमार्गात तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दलीत वस्तीसह गावातील काही घरे बाधित होत आहेत. आमदार पाटील यांनी गावात जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी तसेच म्हणणे आस्थेवाईकपणे जाणून घेत त्यांना दिलासा दिला. जागेचा वाढीव मावेजा मिळवून द्यावा, राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावरून ग्रामस्थांना दिलासा देत विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल यंत्रणेला निर्देश द...

जाहिराती *विनामुल्य प्रकाशित