Skip to main content

ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे

  


ढोर समाज देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा , कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू - सुशीलकुमार शिंदे

 

सोलापूर, (प्रतिनिधी)ः-  मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धर्माजी सोनकवडे, गुरूमाता, राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

         समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पुर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा यापुढे काय करायचे आहे यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष केला पाहिजे तरच यश प्राप्त होते कोणत्याही कामाला लाज वाटू देवू नका असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आरक्षण वर्गीकरणामुळे समाजावर काय परिणाम होणार आहे हे पुढील काळात समजेल परंतु आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण देवून सक्षम केले पाहिजे असेही शिंदे यांनी सांगितले.

        प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे समाजातील मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे असे आपल्या मनोगतामधून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी व्यक्त केले.

       समाजाच्या विकासासाठी मी कायम सोबत राहणार आहे अनेक अडचणी आहेत आरक्षणामध्ये इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.

       प्रारंभी या मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रास्ताविक करीत समाजात अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावे. समाजातील सक्षम असलेल्यांनी मागे राहिलेल्या समाजबांधवाना मदतीचा हाथ दिला पाहीजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना मदत केली तर समाज सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी सांगितले. दिपप्रज्वलन आणि संत कक्कय्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभरात समाजाचे नावलौकीक वाढवणार्‍या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले तर आभार सटवाजी होटकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सुधीर खरटकमल, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर, अशोक सदाफुले, रविंद्र शिंदे, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे, अ‍ॅड विद्या कटकधोंड, राजेश कटकधोंड,विनोद होटकर,नित्यानंद सोनकवडे, विनायक होटकर, गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या मेळाव्यासाठी ढोर समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.

 


Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...