Skip to main content

उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?

 

उद्धव ठाकरे आणि फडणवीस ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ कार्यक्रमासाठी आपले योगदान काय ?

उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ जरूर राबवा या अभियाना मध्ये राष्ट्री सेवा योजनेचा आणि समाजातील स्वयंसेवी संस्थाचा सहभाग गेत्ल्यास अभिया अधिक प्रभाव शाली होईल आणि एस टी च्या प्रशासन आणि व्यवस्थापन अधिकारी आणि र्निग स्टाफ यांचा समावेशा मुळे एस टी च्या प्रवासी सेवेत आणि एकदर एस टी कामकाजावर परिणाम होणार नाही हे लक्षात ठेऊन अभियान राबवावे  

 ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ च मुल्यांकन सुरु मुल्यांकन करणार मंडळाचेच कर्मचारी ,पत्रकार आणि प्रवासी स्घ्त्नेचे पदाधिकारी  पाहूया राज्याचे प्रथम क्रमांकाचे १ कोटीचे बक्षीस कोण मिळवते त एकूण ३ कोटींची बक्षिसे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई,: स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२५  रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी मंत्री श्री. सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करताना, सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते.

तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ” गाभा ” राहणार आहे. हे देखील आवर्जून सांगितले होते. अर्थात, कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्याअर्थाने बसस्थानक हे त्या गावची ” शान ” असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यींकरणासाठी मदत करावी, असे आवाहन मंत्री श्री. सरनाईक यांनी केले आहे.

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘ अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ ब ‘ वर्ग व ग्रामीण ‘ क ‘ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘ अ ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ ब ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘ क ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत


Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...