महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
दिल्लीत जागर मराठीचा… संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा….महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
एक अपूर्व योग जुळून आलाय… आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब.दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन `सरहद, पुणे`च्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार व्हा… त्यात सहभागी व्हा!. भामराठी साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणेकार्यक्रम पत्रिका डानलोड कराउद्घाटन समारंभदि. २१ फेब्रुवारी २०२५ , दुपारी ३.३०उद्घाटन हस्तेमा. नरेंद्र मोदीपंतप्रधानस्वागताध्यक्षमा. शरद पवार९८ वे अ. भा. म. सा. संमेलनप्रमुख पाहुणेमा. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यअध्यक्षामा. डॉ. तारा भवाळकर९८ वे अ. भा. म. सा. संमेलनस्थळ : विज्ञान भवन, नवी दिल्ली- ११००११(प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी)उद्घाटन समारंभ सत्र दुसरेदि. २१ फेब्रुवारी २०२५ , सायं. ६.३० ते ७.३०
अध्यक्षमा. सुशीलकुमार शिंदेमाजी केंद्रीय गृहमंत्रीमा. उदय सामंतमंत्री, उद्योग आणि मराठी भाषा, महाराष्ट्र राज्यमा. ॲड. आशिष शेलारहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्यर्वाध्यक्ष भाषणडॉ. रवींद्र शोभणेसंमेलनाध्यक्ष, ९७वे अ. भा. म. सा. संमेलनअध्यक्षीय भाषण. डॉ. तारा भवाळकरवे अ. भा. म. सा. संमेलनस्थळ - छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली.मान्यवरांचे संदेशsadanand-more-web
दिल्लीचा आणि मराठ्यांचा संबंध फार जुना आणि दृढ आहे. हे जुने बंध लक्षात घेता आता स्वातंत्र्योत्तर काळात, तिथे आपली खूण, ओळख असायला हवी. तिथे आपली भाषा, संस्कृती पोहोचली पाहिजे. त्या दृष्टीने दिल्लीत होत असलेले अ.भा. मराठी साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह अशी घडामोड म्हणता येईल.
डॉ. सदानंद मोरे
ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलन, घुमानचे अध्यक्ष
२१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५
तालकटोरा स्टेडियम , दिल्ली
पद्मविभूषण मा. शरद पवार
स्वागताध्यक्ष,
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली
ज्येष्ठ नेते शरद पवार हे जनमानसाची नस जाणणारे व्यासंगी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तब्बल ५ दशकांहून अधिक काळ संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री व कृषीमंत्री पदे त्यांनी भूषवली आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रदीर्घ आणि मोठा प्रभाव राखणाऱ्या निवडक आणि वलयांकीत मराठी व्यक्तिमत्वांमध्ये शरद पवार यांचे नाव अग्रस्थानी आहे. सन २०१७ मध्ये भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजकारणापलीकडे, शरद पवार यांची स्वतःची निराळी प्रतिमा आहे. ते व्यासंगी वाचक, चिंतक आणि भाष्यकारदेखील आहेत. साहित्याचा आणि त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. एक उत्तम वाचक ही ओळख देखील ते अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळाशी त्यांचे अतिशय आत्मीयतेचे संबंध राहिलेले आहेत. कित्येक दिग्गज साहित्यिकांशी त्यांचे असणारे स्नेहसंबंध तर सर्वश्रृत आहेत. गदिमा, पु.ल. देशपांडे, ना.धों. महानोर यांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील तरुण साहित्यिकांशीही त्यांचा कायम संवाद राहिलेला आहे. साहित्य संस्कृतीतील उच्च मूल्यांची पाठराखण करतानाच नव्या आणि प्रागतिक विचारांचे स्वागत करण्याची त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये आजवर त्यांनी ४ वेळा (छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड येथील संमेलनांमध्ये) उद्घाटक म्हणून भूमिका बजावली आहे. सरहद संस्थेने पंजाब येथील घुमान येथे आयोजित केलेल्या ८८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमलन यशस्वी होण्यासाठी पवार साहेबांनी भक्कम पाठबळ दिले होते, हे इथे उल्लेखनीय.
या पार्श्वभूमीवर, यंदा दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते प्रथमच स्वागताध्यक्षपदाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांचा आजवरचा प्रदीर्घ अनुभव, साहित्य-संस्कृतीशी असणारे घट्ट नाते आणि दिल्ली-महाराष्ट्राच्या संबंधांची असणारी समृद्ध जाण यांमुळे स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
डॉ. तारा भवाळकर
अध्यक्ष,
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,
दिल्ली २०२५
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (जन्म १ एप्रिल. १९३९) या मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासिका असून त्यांनी स्त्री-जाणिवांना प्रखर प्रकाशात आणण्याचेही अमूल्य कार्य केलेले आहे. याशिवाय त्यांनी नाट्यशास्त्रावर संशोधन व संतसाहित्याचाही सखोल अभ्यास केला असून त्यांनी अन्य संशोधनात्मक पुस्तकांशिवाय एकांकिका, ललित निबंध असे विपुल लेखन केले आहे व या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत सहभाग घेतला आहे.
समाजजाणीवांशी एकरूप होत त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधत त्याचा सामाजिक अन्वयार्थ लावण्याचेही महत्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे असे म्हटले तरी चालेल.
मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाच त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचे मराठीतले पहिले भाषांतर केले होत्रे व साहित्य जगताशी नाळ जुळवली होती. त्यांनी विद्यार्थीदशेतच नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, व अभिनयही केला होता. शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा- कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून दिली आणि त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयारी करून दिली, हे त्यांच्या कलेविषयीच्या प्रगल्भ जाणीवा दर्शवते. येथेच न थांबता त्यांनी ‘नाटककार विष्णुदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०) ‘हा प्रबंध लिहून पीएच्.डी. मिळवली.
हे कार्य करत असतांनाच तारा भवाळकर या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे वळाल्या आणि आजवर लोकसाहित्यातील दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे मूलगामी संशोधन केले. त्यातून अनेक ग्रंथ निर्माण झाले. ‘स्त्रीमुक्तीचा जागर’ यासारखे वैचारिक पुस्तक लिहून त्यांनी स्त्रीजाणिवांना एक शास्त्रबद्ध रूप दिले.
शिक्षिका ते प्राध्यापिका हा प्रवास पूर्ण करत असतांना त्यांची संशोधनाची साथ धरली आणि स्त्रीमुक्ती आणि लोकसंस्कृती त्या दोन्ही क्षेत्रांतील अनुबंध जपला, हे त्यांचे मोठेच वैशिष्ट्य होय.
अशा व्यासंगी, प्रगल्भ साहित्य निर्मिती करणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांची निवड ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झाली हा महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि स्त्रीवादाचा सन्मान मानला जातो आहे.
दिल्लीतील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ‘सरहद’ संस्था
१९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या ३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता ७० वर्षे झाली आहेत. मराठ्यांनी अटकेपार आपला झेंडा नेला होता या गोष्टीला त्या काळी राजकीयदृष्ट्या जितके महत्त्व होते, तितकेच महत्त्व आजच्या काळात सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होण्याला आहे. देशाला दिशा देणारे विचार महाराष्ट्रातून, त्यातही पुण्यातून पुढे येतात असा इतिहास असताना पुण्यातल्याच ‘सरहद’ संस्थेच्या विद्यमाने आयोजित होणारे हे आगामी संमेलन दिल्लीला होत आहे हे योग्यच म्हणायला हवे. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी आहे आणि दिल्ली ही राजकीय आणि प्रशासकीय राजधानी. त्यामुळे कुठलाही विचार पुढे न्यायचा असेल, देशभर पोहोचवायचा असेल, तर तो दिल्लीमार्गे जाणे तर्कसंगतच आहे.
‘सरहद’ संस्था देशाच्या सीमावर्ती भागातल्या, विशेषतः हिंसाग्रस्त प्रदेशांमधल्या लोकांना आपुलकी, सेवा आणि मानवतेच्या मार्गाने जवळ करण्याकरता गेली तीस वर्षं कार्य करते आहे. देश जोडणे, विविध प्रदेशांमधल्या लोकांना साहित्य, संस्कृती, कला आणि सेवेच्या माध्यमातून एकत्र आणणे, हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्था जरी पुण्यात असली, तरी संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू दिल्ली राहिलेला आहे. पंजाबच्या असो, काश्मीर असो वा ईशान्य भारत, संबंधित प्रश्नांकरता दिल्लीमध्ये प्रयत्न करणे, राष्ट्रपती व पंतप्रधानांपासून ते विविध मंत्रालयांशी संपर्क साधणे, वेळोवेळी संत नामदेव पुरस्कार, लल देद पुरस्कार, पुस्तक प्रकाशन असे समारंभ दिल्लीत आयोजित करणे अशा विविध कारणांकरता संस्था दिल्लीशी व दिल्लीमध्ये सुपरिचित आहे. आता तर संस्थेने दिल्लीला आपले एक केंद्रदेखील सुरू केले आहे. श्री. अतुल जैन हे तेथील कामकाज पाहतात.
आज देश आर्थिक, सामरिक, परराष्ट्रव्यवहारविषयक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांमध्ये अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असताना गरज आहे ती अंतर्गत सामाजिक ऐक्य टिकवण्याची आणि ते सांभाळण्याची. विविधतेत एकता, हम सब एक हैं या निव्वळ घोषणा न राहता वास्तव तसे असणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी अनेक व्यक्ती व संस्था सरकारी आणि खाजगी पातळीवर कार्य करत आहेत पण हे कार्य अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. जात, धर्म, पंथ आणि तत्त्वज्ञान यांच्याआधारे आपला वेगळेपणा सिद्ध करण्याऐवजी या सर्व गोष्टींचे अस्तित्त्व मान्य करूनही ‘भारत’ आणि आम्ही सारे भारतीय कसे एक आहोत, समरस आहोत हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व पातळ्यांवर सिद्ध करण्याची नितांत गरज आहे. ‘सरहद’ नेमके हेच कार्य आपल्या परीने नेटाने करते आहे.
२०१५ साली ‘सरहद’ संस्थेने ८८ वे मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमान या संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आयोजित केले होते. त्या गावामध्ये मराठीशी फारसा संबंध नसूनही सामान्य जनतेमध्ये या साहित्य संमेलनाबद्दल प्रचंड औत्सुक्य अनुभवाला आले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातूनही हजारो साहित्यप्रेमी त्या निमित्ताने घुमानला गेले व तिथल्या लोकांमध्ये प्रेमादरपूर्वक मिसळले. त्यातून अनेकांचे ऋणानुबंध त्या गावाशी जुळले. त्या तुलनेत दिल्लीमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे व आगामी साहित्य संमेलनामुळे त्यांना एक आगळा आनंद मिळेल. मराठी ग्रंथखरेदी, लेखक-कवींशी भेट अशा अनेक अंगांनी दिल्लीकर मराठी भाषिकांकरता ही एक पर्वणी ठरावी.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत.
महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात.
वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.
महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे संपन्न होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहामंडळाचे विद्यमान सदस्य०१प्रा. उषा तांबे अध्यक्ष मुंबई ०२ श्री. गुरय्या रे. स्वामी उपाध्यक्ष कर्नाटक०३ डॉ. उज्ज्वला मेहेंदळे कार्यवाह मुंबई ०४ श्री. प्रकाश पागे कोषाध्यक्ष मुंबई ०५ प्रा. मिलिंद जोशी सदस्य पुणे ०६ सौ. सुनिता राजे पवार सदस्य पुणे ०७ श्री. राजन लाखे सदस्य पुणे ०८ डॉ. दादा गोरे सदस्य मराठवाडा ०९ डॉ. रामचंद्र काळूंखे सदस्य मराठवाडा १० प्रा. किरण सगर सदस्य मराठवाडा ११ श्री. प्रदीप दाते सदस्य विदर्भ १२श्री. विलास मानेकर सदस्य विदर्भ
१३ डॉ. गजानन नारे सदस्य विदर्भ १४ डॉ. विद्या देवधर सदस्य हैदराबाद
१५ श्री. पुरुषोत्तम सप्रे सदस्य भोपाळ १६ श्री. कपूर वासनिक सदस्य भोपाळ
१७ श्री. रमेश वंसकर सदस्य गोवा १८ श्री. संजय बच्छाव सदस्य बडोदा
१९ श्री. रवींद्र शोभणे संमेलनाध्यक्ष २०२४-२५ विदर्भ
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध तालकटोरा स्टेडियम येथे संपन्न होत आहे. संमेलनस्थळी पोहोचण्याच्या विविध मार्गांची माहिती याठिकाणी देण्यात आली आहे .
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग नवी दिल्ली मेट्रो स्टेशन ते राजीव चौक. (यलो लाईनने प्रवास करणे) राजीव चौक येथे मेट्रो लाईन बदलणे. राजीव चौक ते रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत. (हा प्रवास ब्ल्यू लाईनने करणे) मेट्रो प्रवासाचा एकूण अंदाजित कालावधी- १० ते १५ मिनिटे. रामकृष्ण आश्रम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.५० किलोमीटर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग सराय काले खान ते मयूर विहार फेज-१ (पिंक लाईनने प्रवास करणे)
मयूर विहार येथे मेट्रो लाईन बदलणे. मयूर विहार ते रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत (हा प्रवास ब्ल्यू लाईनने करणे)
मेट्रो प्रवासाचा एकूण अंदाजित कालावधी- ३० ते ३५ मिनिटे.
रामकृष्ण आश्रम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.५० किलोमीटर.
इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग एअरपोर्ट टर्मिनल-३ मेट्रो स्टेशन ते शिवाजी स्टेडियम पर्यंत. (ऑरेंज लाईन ने प्रवास करणे) मेट्रो प्रवासाचा अंदाजित कालावधी- १५ ते २० मिनिटे.शिवाजी स्टेडियम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.०० किलोमीटर. तालकटोरा स्टेडियमपासून जवळची मेट्रो स्टेशन्स रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम – (ब्ल्यू लाईन) अंतर ३ .५० किलोमीटर पटेल चौक (यलो लाईन) अंतर ३ .५० किलोमीटर
मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाल्याने ही भाषा प्राचीन, स्वतंत्र आणि मौलिक साहित्याचा प्रवाह सातत्याने दाखवणारी आहे, या निखळ सत्याचा उद्घोष झाला.
उपलब्ध पुराव्यांनुसार मराठी भाषा किमान २,२०० वर्षांपासून लिखित स्वरूपात अस्तित्वात होती. इसवी सनपूर्व २०० मधील “पाअड लख्खन सुत्त” हे वररुचीकृत व्याकरण प्राधान्याने माहाराष्ट्री प्राकृत म्हणजे प्राचीन मराठीचे व्याकरण सूत्रबद्ध कीर्ते. याचाच अर्थ महाराष्ट्रातील लोकांच्या बोलण्यात ही भाषा त्याही पूर्वीपासून समाजजीवनात नित्य व्यवहारात वापरली जात होती, हे स्पष्ट होते. इ.स.पूर्व पहिल्या शतकातील नाणेघाट, लोहगड व पाले येथील शिलालेखही उपलब्ध आहेत. याच काळात सातवाहन घराण्यातील नृपती हालाने संपादित केलेला गाथा सप्तशती (गाहा सतसइ) हा काव्यग्रंथ तत्कालीन समाजजीवनाच्या भावभावनांचे मनोरम दर्शन घडवतो. या संग्रहात किमान २८ कवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे, हे एक विशेष. त्यानंतर जैन आचार्य विमल सुरी यांनी सन ६ मध्ये “पउमचरिय” हे रामकथेवरील आद्य महाकाव्य लिहिले. तेव्हापासून साहित्याचा सलग प्रवाह आपल्याला आढळून येतो. मग ते तिसऱ्या शतकातील आद्य प्रवासकथात्मक वासुदेव हिंडी असो की उपकास कथा धुर्ताख्यान असो, लिलावइ सारखे प्रेमकथा असलेले महाकाव्य असो की कुवलयमाला यासारखी अद्भुतरम्य प्रेमकथा असो, असे विविधांगी, जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे साहित्य मराठीत लिहिले गेले.
कालौघात भाषा विकसित होत जातात आणि तेच जिवंत भाषेचे लक्षण असते. सातवाहनकालीन मराठीही कालौघात बदलत राहिली. या बदलाच्या खुणा आपल्याला प्रत्येक शतकातील साहित्यात दिसून येतात. बाराव्या शतकातील महान कवी मुकुंदराज हे आधुनिक मराठीचे उद्गाते म्हणता येतील. ते जुनी मराठी आणि नव्या मराठीतील दुवा ठरले. ज्ञानेश्वर ते तुकाराम असा सलग संतसाहित्याचा प्रवाह मराठीच्या प्रागतिक होत जाण्याचापुरावा आहे. बखरी व तत्कालीन पत्रव्यवहारही समाजजीवनात बोलण्यात असलेल्या मराठीचे दर्शन घडवतात.आज मराठीने आधुनिक रूप धारण केले आहे. आजचे मराठी साहित्य हे मानवी संवेदनांना, आशा-आकांक्षांना कवेत घेत सर्व आधुनिक साहित्याचे प्रकार हाताळत मराठी भाषेचे वैभव वाढवत आहेत.मराठी भाषेने अन्य भाषांतील शब्द स्वत:चे रूप देऊन जसे स्वीकारले तसेच अन्य भाषांनाही शब्द उधार दिले. असे असले तरी मराठी भाषेची मूळ प्रवृत्ती मात्र प्राचीन काळापासून आजतागायत अखंड व सलग राहिल्याचे आपल्याला दिसते.केंद्र सरकारने रंगनाथ पठारे समितीचा अहवाल स्वीकारून मराठी भाषा स्वतंत्र असल्याची खात्री दिल्याने अर्थातच मराठी भाषकांच्या आत्मसन्मानात भर पडलेली आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्याला त्यामुळे निश्चितच मोलाची मदत होणार आहे.
Comments
Post a Comment