Skip to main content

निस्वार्थ प्रेमाचा अन् अखंड श्रमाचा झरा अन सोलापूरचे शिल्पकार म्हणजे सुशीलकुमार शिंदे - ॲड. मनीश गडदे पाटील सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मुंबई


आपल्या ५५वर्षांच्या नैतिक व प्रामाणिक सामाजिक जीवनात आणि राजकीय कारकीर्दीत भूषवलेली सर्व सन्मानांची पदे व संवैधानिक जबाबदारी पार पाडताना आपल्या जन्मभूमी सोलापूर करिता सतत विकासाचा हक्काचा वाटा पोचवण्याचं प्रामाणिक काम सोलापूरचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक केल्यानेंच सोलापूरचं नाव आज देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे प्रतिबिंबीत होत आहे.

दगडू संभू शिंदे उर्फ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे,  गरीब घरातला एक सामान्य तरुण ते असामान्य व्यक्तिमत्त्व हा प्रवास कदाचित पुढील पिढ्यांमध्ये अविश्वसनीय वाटावा असाचं आहे. जीवनात एक माणूस आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, खासदार, केंद्रीय मंत्री, देशाचा गृहमंत्री, संसदेचा नेता ही सर्व भारतीय लोकशाहीतील संविधानिक पदे आपल्या कर्तृत्वाने भूषवतो हि बाब स्वतंत्र भारतात अभिमानास्पद आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फोरम फॉर सोशलीस्ट ॲक्शनचे राज्य निमंत्रक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष, केंद्रीय सरचिटणीस, 14 राज्याचे प्रभारी, सर्वोच्च काँग्रेस वर्किंग कमिटी CWCमेंबर, उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, नियोजन घटना शिस्तपालन समितीचे सदस्य यासह अनेक संघटनात्मक जबाबदारी शिंदे साहेबांनी पार पाडली आहे.

देशातील अनेक विद्यापीठांनी मानद डि.लीट पदवीने सन्मानीत करून त्यांचा गौरव केला आहे, कुलपती होण्याचा बहुमान सुद्धा त्यांना मिळाला, जगातील सर्वोच्च "युनो" मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बालकामगार व असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर प्रबंध सादर करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

आपल्या गौरवशाली प्रवासात सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःची "सोलापूरचा सुपुत्र" ही ओळख सातत्याने सर्वत्र ठसविली म्हणूंनच आजही भारतात कोणत्याही शहरात गेलेल्या सोलापूरकरांना सोलापूरचा आहे म्हटल्यावर "सुशीलकुमार शिंदे जी का गांववाला है|" म्हणून आदराने सन्मान दिला जातो हि खरंतर आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

सोलापूर शहर व जिल्हा याचा सामाजिक, पायाभूत, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून १०लाख लोकसंख्येचं बहुभाषिक कामगारांचे शहर व सुमारे 40 लाख लोकसंख्येचा दुष्काळी अवर्षणग्रस्त जिल्हा हि ओळख असताना आपल्या सोलापूरची सर्वांगीण प्रगतीची गरज ओळखून आजपर्यंत दरवेळी अनेकानेक नाविन्यपूर्ण कामे आदरणीय शिंदे साहेबांच्या मेहनतीने, नियोजनाने, दूरदृष्टीने, सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नाने साकारली आहेत..

 

सर्वांगीण विकास कामांची यादी तशी मोठी आहे तरीसुद्धा हा थोडक्यात आढावा घ्यावा लागतोय...,

 

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असताना सोलापूरची वरदायिनी भीमा नदीवर "उजनी धरणाच्या" योजना, कालवे, वितरिका, मोठे मध्यम साठवण तलाव यांना सलग दहा वर्षे एक रुपया कमी पडू दिला नाही आज त्याची प्रचीती म्हणून जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, केळी, बोर फळबागांचे प्रचंड उत्पादन तर बागायती उसाचे क्षेत्र वाढून देशात सर्वोच्च एका जिल्ह्यात 42 साखर कारखाने उभारलेत. राष्ट्रीय ज्वारी, डाळिंब, ताग संशोधन केंद्र कार्यान्वित आहेत, सोलापूर शहरासाठी उजनी धरणावरून 110 कि.मी. लांबीची पाइपलाइन सोलापूरकरांची तहान भागवते आहे, ४५वर्षापूर्वी आणलेलं आकाशवाणी केंद्र अविरत मनोरंजन करत आहे.

'मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य' असताना सोलापूरला एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ मंजूर केलं आणि जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती झाली आज रोजी जिल्ह्यात 150 महाविद्यालये, दोन मेडिकल कॉलेज, दोन आयुर्वेदिक कॉलेज, दोन होमिओपॅथिक कॉलेज, 27 इंजिनिअरिंग/ डिप्लोमा कॉलेज, एकमेव विज्ञान केंद्र यांनी जिल्ह्याचा शैक्षणिक वटवृक्ष बहरला असून लक्षावधी तरुण विद्यार्थी दर्जावान पदवीसंपन्न होत आहेत.

सोलापूरचे "छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचा" कायापालट केला व विस्तारित 'बी' ब्लॉक नव्याने बांधल्याने आज रोजी रोज ५०००हजार रूग्णांची ओपीडी चालू असून, १५०० रुग्णांच्या ऍडमिटची सोय झाल्याने सोलापूर आजूबाजूच्या जिल्ह्यातील जनतेच्या रूग्णसेवेला सक्षम झाल्याने विविध हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, प्रथितयश डॉक्टर्स यांचे उत्कृष्ट नेटवर्क निर्माण झाले असून आज सोलापूर 'मेडिकल हब' म्हणून ओळखले जात आहे.

केंद्रीय मंत्री म्हणून भारताच्या मंत्रिमंडळात काम करताना उर्जामंत्री असताना 1320मेगावॅट NTPC वीजनिर्मिती प्रकल्प उभारला, 5000 मेगावॅटचे पाॅवरग्रिड उभारले यामुळेच हजारो रोजगार निर्मितीचे साधनं निर्माण झाली, अर्थकारण वाढलं, विशेषतः सन 2012 सालापासून सोलापूरला लोडशेडिंगचा त्रास बंद झाला. याच काळात सोलापुरात आंतरराष्ट्रीय डॉक्टर कोटणीस यांचे स्मारक उभारले गेले जे संपुर्ण जगातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

देशाच्या स्तरावर "गृहमंत्री व संसदेचा नेता" म्हणून काम करताना सोलापूरला 7नॅशनल हायवे मंजूर झाले, देशातील सर्व दिशेला प्रयत्नपूर्वक रेल्वे सेवा चालू केली आणि सोलापूर शहर-जिल्हा देशाच्या कानाकोपऱ्यात जाणायोग्य दळणवळणाने सिद्ध झाला, सोलापूर जिल्हा देशाच्या नकाशावर आला. गृहमंत्री म्हणूनच निमलष्करी दलाची तीन ट्रेनिंग मिलिटरी सेंटर BSF, CISF, SSB ही मंजूर केली.

सोलापूर शहराच्या पायाभूत विकासाकरता नियोजन, वित्तआयोग, UIDSSMT,  JNNURM, नगरोत्थान योजनांमधून हजारो कोटी रुपये मंजूर करून रस्ते, ड्रेनेज, पाण्याच्या टाक्या, वसाहती, सुविधा निर्माण केल्या. सोलापूरचा स्मार्ट सिटी समावेश याच आधारावर झाला आहे. शहरात तीन एमआयडिसी निर्माण झाल्या, शहरातील मध्यवस्तीमध्ये 1975 ला चालू केलेले विमानतळ असताना भविष्याची गरज ओळखून बोरामणीला आंतरराष्ट्रीय 'कार्गोहब' विमानतळ मंजूर केले दोन हजार एकर जमीन संपादित केली आहे.

धार्मिक यात्रेकरूंना आज सोलापूर, पंढरपूर, अरण, मार्डी, वडवळ, मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, कुडलसंगम ही सर्व तीर्थक्षेत्रे पर्यटन विकासाची केंद्रे झाली आहेत. सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरचे नूतनीकरण व फडकुले सभागृहाची उभारणी, महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ८८वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे भव्यदिव्य आयोजन, उर्दू संमेलनाचे आयोजन, दमाणी-पटेल पुरस्कार हे सर्व सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बाबी आहेत. सुशीलकुमार शिंदे साहेबांचा कलावंत म्हणून रसिकांचा उत्साह वाढवणारी आहेत.

लोककल्याणकारी भारतातील लोकप्रतिनिधी म्हणून सोलापूरच्या जनतेने दिलेल्या प्रचंड प्रेमाची व दाखवलेल्या विश्वासाची उतराई कृतज्ञतेच्या स्वरूपात सुशीलकुमार शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावून सोलापूरसाठी प्रामाणिकपणे भरभरून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला आहे. हा निस्वार्थ प्रेमाचा अन् अखंड श्रमाचा सोलापूरचा 'भगीरथ' म्हणूनच "सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा शिल्पकार!" आहे असं माझं ठामं मत आहे.

 




Comments

Popular posts from this blog

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०    व्या वर्षाकडे    वाटचाल    सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९    वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९    वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे - प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप , महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते , त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत , आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत , पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर , सरपंच संतोष देशमुख हत्या , महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत , यावर सरकार काही करताना द...

सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील

  सोलापूर शहर पाणीपुरवठ्यातील दुजाभाव थांबवा! अन्यथा आंदोलन कॉंग्रेसचे अ़ॅड. मनीश गडदे पाटील सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड , नियमित , सुरळीत , एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.       सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक , सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.       सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार ४दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शह...