पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पुणे , दि. 13 : सुमधूर सनईवादन , सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना , महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन , गुजराती लोकनृत्य डांग , डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य , राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य , द ग्लोरी ऑफ सरहद , आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा ‘ वसुधैव कुटुम्बकम् ’ नृत्याविष्कार , महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या ‘ ऱ्हिदम ऑफ लावणी ’ श्री गणेश आरती …. अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे , फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे , याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केले. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भारत सरकारचा पर्...